पोस्ट्स

Face-off with bear at DodiTaal Trek: May.2017 by Prakash Kulkarni

स्वछंदच्या हिमालयातील दोडीताल trek दरम्यान १ मे २०१७ ला घडलेली थरारक घटना.  - प्रकाश कुलकर्णी  (स्वच्छंदी) ब्रेकफास्ट करून आम्ही सर्वजण निघालो. सुरवातीपासून चढण होती, पण निसर्गरम्य जंगलाचा परिसर होता त्यामुळे सर्वजण उत्साहात होते.  चढ असूनही पावले भराभर पडत होती. तरूण मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या बरोबर आमचा गाईड कम लीडर होता. एकमेव रस्ता असल्याने, चुकण्याची शक्यता नव्हती. सारे कसे all well चालले होते. मुक्कामाच्या ठिकाणाहून निघाल्या पासून दोन अडीच तास झाले असतील. काहीजण पुढे, काहीजण मागे तर काहीजण तात्पुरत्या थकव्याने थोडी विश्रांती घ्यावी म्हणून सावलीत बसले होते. भरपूर चढ चालून आल्याने मी ६७ वर्षांचा अनुभवी खेळाडू जरा दमलो होतो पण मनाने उत्साहीत होतो. अशावेळी नेहमीच मला माझ्या अनुभवाचा सल्ला असतो कि "हळू का होईना" चालत राहायचे, म्हणजे रस्ता लवकर संपतो. असो. मी, प्रप्द्मुम्न आणि आमचा गाईड प्रथमसिंग असे पुढे निघालो होतो. पुढे एका ठिकाणी प्रद्मुम्नपण म्हणाला काका, आपण जरा थांबून या.  माझी थांबण्याची ईच्छा नव्हती, म्हणून मी प्रथमसिंगला म्हटले "अगर मै आगे...